भगीरथ व्यायामशाळा उपक्रम
हनुमान जयंतीनिमित्त ‘भगीरथ व्यायामशाळे’तील व्यायामपटूंनी सूर्यनमस्कार काढून अनोख्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी केली. सध्या व्यायामशाळेमध्ये ५४ व्यायामपटू व्यायाम करण्यासाठी येतात. वार्षिक ३००/- रु. त्यांची फी आपण ठेवली आहे. भगीरथ व्यायामशाळेच्या इमारतीचे कामही पूर्णत्वास आले असून या महिन्याभरात इमारतीचे सर्व काम पूर्ण होईल. अजूनही सुसज्ज अशी व्यायामशाळा बनविण्याचा आमचा मानस आहे.