यांचा आनंद १००%

    


तरुण भारत, सिंधुदुर्ग आणि भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी ‘यांचा आनंद १००%’ हा कार्यक्रम दिनांक ३१ जुलै २०१६ रोजी संपन्न झाला.

ज्या मुलांनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा जिद्द, मेहनत आणि काहीतरी करून दाखविण्याची इच्छाशक्ती यांच्या जोरावर १० वी आणि १२ वी परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळविले अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना पुढच्या शिक्षणासाठी प्रोत्साहनपर आर्थिक मदत करणे हा या कार्यक्रमाचा मुळ उद्देश असतो.

यावर्षी मान. श्री. रविंद्र कर्वे, ठाणे यांच्या सहयोगातून भगीरथ प्रतिष्ठानने ६९ यशस्वी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली तर उर्वरीत ११ विद्यार्थ्यांना श्री. सद्गुरू सदानंद (माऊली) महाराज संप्रदायामार्फत आर्थिक मदत करण्यात आली.

या कार्यक्रमाला मान. श्री. रविंद्र कर्वे, ठाणे, मान. अॅड श्री. अजित गोगटे, देवगड, तरुण भारत चे सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख मान. श्री. विजय शेट्टी, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, डॉ. रविंद्र जोशी, डॉ. योगेश नवांगुळ, यशस्वी विद्यार्थी, पालक आणि पत्रकार बंधू उपस्थित होते.