'भगीरथ' च्या नवीन निवासी प्रशिक्षण केंद्राचा लोकार्पण सोहळा

    

वडाचे झाड मोठे झाले की, त्याला पारंब्या येतात. आकाशाला गवसणी घालताना जमिनीशी घट्ट नाते यामुळे तयार होते. ‘भगीरथ’सारखे काम अनेक ठिकाणी व्हावे यासाठी निवासी प्रशिक्षण केंद्राची गरज होती.

 


९ एप्रिल २०१७ ते ३१ मे २०१८ या १४ महिन्यांच्या कालावधीत अनेक श्रमिकांच्या कष्टातून प्रशिक्षण केंद्राची इमारत पूर्ण झाली. मा. श्री. विनोदजी तावडे व मा. श्री. कल्याण वर्दे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला.