गावठी बाजारातील खरेदी ही ग्रामीण विकासाची आनंदयात्रा असते. गावठी बाजार ही विक्री व्यवस्था सर्वांच्या टीमवर्कमधून मूर्त स्वरुपात आली. कणकवली, सावंतवाडी व झरेबांबर या ठिकाणी बाजार सुरु झाले.
कोकणामधील जैवविविधता यामध्ये प्रदर्शित झाली. विक्रेता व ग्राहक यामध्ये दलाल नाही, त्यामुळे फायदा अधिक आहे. सावंतवाडीच्या गावठी बाजारामध्ये ९२,६७७/- रुपयांची विक्री झाली.