निवजे गावामध्ये SRI भात पिकाच्या शेतीशाळेचा श्री गणेशा

    

                कोकणातील भाताची प्रति गुंठा उत्पादकता अवघी ३५–४५ किलो आहे. SRI पद्धत शेतकऱ्यांनी आत्मसात केल्यास यामध्ये प्रति गुंठा ७० किलो भात मिळू शकते. आपल्याच जिल्ह्यामध्ये प्रति गुंठा ११० किलो भाताचे उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. कृषि अधिकारी श्री. निलेश उगवेकर व त्यांचे सहकारी पिकाच्या वाढीपर्यंत दर पंधरा दिवसांनी ३ तासाच्या अशा एकूण ८ शेतीशाळा घेणार आहे.

  नाबार्डचे जिल्हा प्रबंधक श्री. अजय थुटे यांनी कृषि उत्पन्न दुप्पट करणाऱ्या संकल्पाचा आढावा घेतला. भगीरथ संस्था SRI पद्धतीसाठी तण नियंत्रण व आंतरगत मशागतीसाठी ५०% अनुदानावर माणगाव येथेच तयार झालेले कोनोविडर (कोळपी) देणार आहेत.