आंबेगावातील मासे विक्री करणाऱ्या महिलांचे श्रम वाचले. / The Labour saved is income raised

    
|

  आंबेगाव हे सावंतवाडी तालुक्यातील डोंगरांनी वेढलेले गाव या गावाचा शेती हाच प्रमुख व्यवसाय. पूर्वी गावामध्ये वीटभट्टी चालायच्या. त्यातून रोजगार निर्मिती होत असे, पण धनगर समाजातील २५ महिलांनी रोजगाराची नवीन पायवाट स्वत:च शोधली. घाऊक दराने मासे खरेदी करून सावंतवाडी शहरामध्ये घरोघरी फिरून त्या किरकोळ मासे विक्री करतात. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप, उमेद व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या सहकार्यातून रोजगाराच्या पायवाटेचे रुपांतर त्यांनी हमरस्त्यामध्ये करण्याचे ठरविले.

ambegav1_1  H x

उत्तम प्रकारच्या पोलादापासून बनविलेले सुरे या महिलांना ५०% अनुदानावर वितरीत करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या सर्वांची बँक खाती उघडून घेतली असून, नजीकच्या काळात त्यांना २५ ते ५० हजार रुपयांचे कॅश क्रेडिट व रूपे क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे. सकाळी ६ च्या गाडीने सावंतवाडीत येणे व सायंकाळी ४.३० च्या गाडीने घरी परतणे आणि यामध्ये होणारा ५ ते ६ किलोमीटरचा पायी प्रवास या महिला आनंदाने करतात. कारण यातून त्यांना रोज ३०० ते ५०० रुपयांचा नफा होतो. बँकेचे सहकार्य मिळाल्यामुळे नफा अधिक वाढेल व त्यांना बचतीची सवय लागेल.
ambegav2_1  H x

            सदर उपक्रमासाठी उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक श्री. शिवराम परब, प्रभाग समन्वयक श्री. अभय भिडे, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखाधिकारी श्री. नितीन सावंत, विस्तार अधिकारी श्री. गोठोसकर व बँक सखी श्रीम. संजना कोरगावकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

The Labour saved is income raised

     Aambegaon is a village in the Sawantwadi taluka, surrounded by hills. Agriculture is the main occupation of the village. There were brick kilns in the village before. 25 women from the dhangar(shepheard)community paved an independent way of employment. They buy fish at a wholesale rate at a local market and sell it door to door at homes in Sawantwadi. Bhagirath Gramvikas Pratishthan, Umed and Sindhurg District Central Co-operative Bank (SDCC) decided to support the initiative and strengthen their efforts.

   Fillet knives made from best of the steel were distributed among these women. The knives are a bit heavy but much more physical labour issaved as it gives them good grip making filleting a lot easier. 50 percent of grant was made available by SDCC bank and others. The Bank has also opened their bank accounts and in the following months the bank will also be giving 25 to 50,000 as cash-creditfacility as well as Ru-pay credit cards. It has become their routine to come to Sawantwadi at 6 am and leave by the bus at 4.30 pm after the sell is done. They walk 5 to 6 kilometres during the day for the selling without any complaints and it also serves them a profit of around 300 to 500 rupees. We are assured that with the bank's co-operation their profits will increase and saving will become a habit.

   It was the valuable contribution by the following people that made this initiative a success. The list includes Taluka initiative manager of Umed, Shri. Shivaram Parab and Regional Co-ordinator of Umed, Shri. Abhay Bhide, along with the Branch manager Shri. Nitin Sawant, Development officer Shri. Gothoskar and Bank sakhi Mrs. Sanjana Korgaonkar.

ambegav3_1  H x