आकाशकंदील स्पर्धा म्हणजे सृजनाची, चैतन्याची दिवाळी पहाट
|

यावर्षीच्या आकाशकंदील स्पर्धेमध्ये ‘पर्यावरणपूरक आकाशकंदील’ हा विषय होता. स्पर्धेमध्ये नारळाच्या झावळ्या, बांबू यांसारखे साहित्य वापरून केलेल्या कलाकृती लक्षवेधी ठरल्या. श्री. जनार्दन खोत व श्री. बाळ पालव यांनी परीक्षणाचे काम पाहिले. स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या २८ मुलांसाठी ‘आकाशकंदील कसा बनवावा’ यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचे ठरले आहे.