गोष्ट निवजे गावाची... (The story of the village Nivaje)

    
|

गोष्ट निवजे गावाची

            तळ कोकणातील सारी गावेच निसर्गाने समृद्ध असतात. डोंगर, ओहोळ, नदी, पठार (सडा), गवताळ प्रदेश सारे भौगोलिक प्रकार येथे दिसतात. मालवणी बोलीतला ठसका येथील माणसांच्या बोलण्यात जाणवेल. गावातील कुणीतरी मुंबईला असतो. त्यामुळे जगाचे भान त्यांना असते. एके दिवशी ‘निवजे’ गावामध्ये टस्कर (रानटी नर हत्ती) आल्याची बातमी आली आणि सारे वातावरण बदलले. हत्तींच्या कळपाचा ७ ते ८ दिवसांचा मुक्काम या गावातील जंगलामध्ये होता. हत्तीच्या हल्ल्यामुळे २ शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. २ शेतकरी गंभीर जखमी झाले. हत्ती गावात एवढे दिवस राहिला याचा अर्थ त्याला खाण्यासाठी लागणारे पुरेसे खाद्य येथील जंगलामध्ये होते. नकारात्मकतेमध्येसुद्धा विकासाचे अंकुर असतात. फक्त त्याला खतपाणी घालावे लागते व त्याचा अर्थ समजावा लागतो.
Nivaje 1_1  H x
          जल, जमीन, जंगल, जानवर, जीवन हे ‘ज’च्या बाराखडीतील शब्द सोपे पण कृतीसाठी कठीण असतात. नसबंदी, नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, श्रमदान या पंचसूत्रीची किमयाही मोठी असते. गरज असते ती गाव व विकास प्रक्रियेमधील सुसंवादाची. ‘भगीरथ’ने हा सुसंवाद घडविला. श्री. दत्तात्रय सावंत, श्री. अभय परब, श्री. सुधीर राऊळ, श्री. निलेश पालव, श्री. नारायण पालव, श्री. महादेव पालव, श्री. राकेश पिंगुळकर, श्रीम. सावित्री परब, श्रीम. संपदा पिंगुळकर या ग्रामस्थांची साथ लाभली आणि कृषी पर्यटनाचे गाव म्हणून ‘निवजे’ गावाची ओळख झाली. हे सारे अचानक घडले नाही, त्यासाठी ५ वर्षाचा कालावधी लागला.

Nivaje 2_1  H x

            UPNRM (नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन) हा प्रकल्प नाबार्ड, सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँक, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान हे सर्वजण राबवितात. याद्वारा १३० बायोगॅस या गावामध्ये बांधले गेले. नैसर्गिक साधनाचे रुपांतर संपत्तीमध्ये करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, कर्जपुरवठा, संघटन, लोकसहभाग सारेच लागते. प्रति बायोगॅससाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने २०,०००/- रुपयांचे कर्ज दिले. UNDP, BPCL, IRCON यांच्यासारख्या संस्थामधून गरीबांसाठी विशेष मदत बायोगॅससाठी दिली गेली. ५५ प्रेशर कुकर ५०% लोकवर्गणीतून दिले गेले. घरातील चुलीमधून निघणाऱ्या धुराची जागा प्रेशर कुकरच्या नादमय शिट्टीने घेतली आहे.
Nivaje 3_1  H x

            श्रीम. ज्योती पावसकरच्या गोठ्यामध्ये आता मुऱ्हा जातीच्या एकूण ५ म्हैशी आहेत. शेततळीचे रुपांतर विहिरीमध्ये झाल्यामुळे ओल्या चाऱ्याची व्यवस्था झाली आहे. साऱ्यांनी बँकेची कर्जे नियमित फेडली. गावामधील ‘निवजेश्वर दुध उत्पादक सहकारी संस्थे’चे सुसज्य दुधसंकलन केंद्र आहे. आतापर्यंत ३४ लाख रुपये दुधातून मिळाले. लॅपटॉप, वजनाचा काटा, SNF, फॅट मोजण्याचे मशिन यामुळे दुधाची गुणवत्ता वाढली आहे. पूर्वी गवळी ३६ रु. दर द्यायचा आता सरासरी ४० ते ४५ रु. दर प्रति लिटर दुधाला मिळतो. एका लिटरला ५५ रु. मिळविणारे गुणवान शेतकरी या गावामध्ये आहेत. आता गुणवत्तेची स्पर्धा सुरु झाली आहे. दर महिन्याच्या तीन, तेरा, तेवीस तारीखला दुधाचे पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. दुर्गम गावांसाठी दुधाचा व्यवसाय हा रोजगाराची शाश्वत हमी देतो. ५ लिटर दुधाच्या मागे एका बेरोजगाराला गावामध्ये काम मिळते. शहरामधील गर्दी कमी करायची असेल, तर अशा प्रकारच्या छोट्या कामातून मोठे उद्दिष्ट साध्य होऊ शकते.
Nivaje 4_1  H x
         ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून गावाची शाळा डिजिटल केली. विहिरीत पंप बसविला. मुलांची पाण्याची सोय झाली. निवजे गावातील भजनी मंडळ हे नेहमी स्पर्धांमध्ये नंबरामध्ये असते. बुवा श्री. महेंद्र पिंगुळकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक गावांमध्ये भजन, गायन, वादन शिकवणारे वर्ग चालतात. गावामध्ये सार्वजनिक कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीम आहे. सण-समारंभासाठी बरेचदा मोठ्या शहरात भाड्याने भांडी आणावी लागतात. आता या ग्रामस्थांकडे ४० ते ५० हजार किंमतीची भांडी आहेत. दर वर्षी ८ ते १० हजाराचे भाडे यातून मिळते. ‘भगीरथ’ने दोन गोष्टीचा आग्रह ग्रामविकासामध्ये धरला, मागणी आधारीत योजना व ५०% लोकवर्गणी त्यामुळे संस्थेने काम करताना लोकसहभागाबरोबरच आर्थिक बरोबरीची सवय लावली.

Nivaje 5_1  H x
            विकास काम हे बेरजेचे असते. अनेक समाजघटक त्यामध्ये येतात. शासन, लोक, बँक, स्वयंसेवी संस्था यांचा मेळ जमला पाहिजे. हत्ती हे समृद्धीचे प्रतिक असते. त्याला समजून घेतले पाहिजे. निसर्ग चक्रामध्ये मुंगी छोटी व हत्ती मोठा असे नसते. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव असतो. छोटा व मोठा हा आपल्या समजूतीचा भाग आहे. आम्हांला वाटतं की, शहर आणि गावांचेही तसंच आहे. शहर म्हणजे शहाणी आणि गाव म्हणजे खेडूत, अशिक्षित लोकांची वस्तीस्थानं अशी रूढ समजूत आहे. निवजे गावामध्ये काम करत असताना ‘भगीरथ’ला एक अनुभवाने समृद्ध लोकसमूहाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. निसर्गाला समजून घेतले नाही तर निसर्ग आपले रौद्र रूप दाखवितो, पण निसर्गाला समजून घेत पर्यावरणपूरक, शाश्वत विकास हा निवजे गावाने केला आहे. ही प्रक्रिया आता गतिमान झाली आहे.
Nivaje 5_1  H x
             कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक श्री. निलेश उगवेकर यांच्या नेतृत्वाखाली भात पिकाची शेतीशाळा झाली. ६ आठवड्यांचा कार्यक्रम शेतकऱ्यांना ज्ञानसंपादन करणारा ठरला. एकट्या निवजे गावामध्ये SRI लागवडीचे क्षेत्र ३०० एकर होते. पारंपारिक पद्धतीमध्ये गुंठ्याला मिळणारे उत्पन्न ३४ किलो होते. ते आता ७० ते ८० किलो पर्यंत पोचले. ‘चांदा ते बांदा’ योजनेतून शेती अवजारे (पॉवर ट्रिलर, भात लागवड यंत्र, ग्रासकटर) देण्यासाठी १० लाख रुपये मिळाले. तसेच केंद्र सरकारच्या कोरडवाहू विकास योजनेंतर्गत २५ लाखांचा निधीही मिळणार आहे. आमदार, खासदारांना हे गाव आता माहिती आहे. लोकप्रतिनिधी या सर्व विकास कामामध्ये सहभागी झाले आहेत. गावाचा पुढाकार व शासनाचा सहभाग हे सूत्र शाश्वत ठरत आहे. कृषी पर्यटनासाठी व शाश्वत विकासाचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियातील ३५ विद्यार्थ्यांचे आदरातिथ्य गावाने ८ दिवस केले. परस्पर संस्कृतीचा परिचय व्हावा हा या उपक्रमाचा हेतू होता. पुण्याच्या ऑथेंटिकाचे श्री. रविराज व श्रीम. सायली जोशी यांनी याचे आयोजन केले होते.
Nivaje 7_1  H x

            एकाच गावामध्ये अडकून रहायचे नाही. ५ वर्षांनी दुसऱ्या गावामध्ये जायचे व पुन्हा श्रीगणेशा सुरु करायचा. आता निवजेमध्ये सक्षम टीम तयार आहे. आम्हालाही दुसऱ्या गावाचे वेध लागले आहेत. मालवणी मध्ये एक म्हण आहे, ‘जावई आणि मासा ३ दिवसाच्यावर राहता कामा नये’. पूर्वी असे म्हटले जायचे की, सन्याशाने एकाच गावामध्ये थांबू नये. ‘भगीरथ’ने हे तत्वज्ञान पहिल्या पासून आचरणात आणले आहे. स्वयंसेवी संस्था ही आधाराचे काम करणारी रचना हवी. मदतीमुळे गाव अपंग होता कामा नये. स्वयंपूर्ण आत्मनिर्भर गावांचा समूह हे आपल्या भारत देशाचे बलस्थान आहे.

डॉ. प्रसाद वामन देवधर

अध्यक्ष, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान

मोबा. ९४२२५९६५००.

The story of the village Nivaje

All the villages in the south Konkan are naturally rich. Be it hills or streams or river or plains or grasslands – you find all of it here. The stingy humor of the dialect is much more evident on the tongue of the native speakers. Some or the other person in the village will be found settled in Mumbai, which gives the village and its residents quite a reality check. One fine day, a wild male tusker showed up in the village followed by the herd. His visit made quite a few headlines and things changed. The herd stayed in the nearby forest for a week. Two farmers lost their life as they were attacked by these elephants and two others were severely damaged. The stay of the elephants proved that the forest had sufficient food to offer. Even negativity has certain seeds of development. You need to identify and nurture these ones.

Water, Land, Forest, Animal, Life are words that mean more than the literal meaning they carry. Vasectomy, deaddiction, axe ban and voluntary public labor are instrumental initiatives. The actual need is the communication between the necessities of the village and the process of development. Bhagirath has made the communication not only possible, but quite an effective one. The residents like Dattatray Sawant, Abhay Parab, Sudhir Raul, Nilesh Palav, Narayan Palav, Mahadev Palav Rakesh Pingulkar, Mrs. Savitri Parab and Mrs. Sampada Pingulkar have lent in great support and help. Their support and help has put Nivaje on the map as a destination for agro tourism. All of this didn't happen overnight, it took five years.
Nivaje 8_1  H x

NABARD, Sindhudurg District Central Co-operative Bank and Bhagirath Gramvikas Pratishthan have jointly conducted the Umbrella Programme for Natural Resource Management (UPNRM) project. Under the project, 130 biogas units were built in the village. We need science, technology, credit mechanism, unity and public participation to convert natural resources into wealth. The district co-operative bank issued a loan of 20,000 rupees for each unit of biogas. Institutions like UNDP, BPCL, and IRCON provided special help to the poor regarding biogas. 55 pressure cookers were distributed through 50 % of crowd funding. The smoke of the traditional Chullhas was replaced by the melodious whistles of the pressure cookers.

         Mrs. Jyoti Pawaskar has 5 buffaloes of the Murha specie. Since the lakes in the fields have been replaced by wells, it has made wet fodder feasible. All have repaid their debts well in time. The Nivajeshwar Milk Producers' Co-operative Society has developed a well equipped milk collection centre. An income of 34 lakh rupees has been generated only through milk till date. Laptop, weighing machine, SNF, a machine for counting fats in milk has resulted in the enhancement in the quality of the milk. Earlier the milkman would deal for 36 rupees for 1litre now he happily pays an average 40-45 bucks for 1 litre. Some brilliant farmers even get 55 rupees for l litre. There is a competition in the village on the basis of quality. Every month the money for milk is deposited into the bank accounts of these farmers. Milk production is a source of sustainable income for the villages in remote areas. It can also have an impact on the rate of unemployment. Such small steps can ensure bigger aims. It can also be instrumental in reducing the crowd of the cities.
Nivaje 9_1  H x

The residents of the village digitized the local school through crowd funding. The motors and pumps on the wells ensured drinking water for students. A group of performers and singers of devotional songs, locally famous as bhajani mandal have been winning hearts and competitions. The lead singer and bhajan performer Mahendra Pingulkar has led tuitions and trainings for bhajans, singing as well as playing musical instruments. The village has its own sound system for public functions. In cities one has to rent utensils for big festivals and occasions. In Nivaje, the villagers have utensils worth 40-50 thousand rupees. This generates an annual rent of rupees 8 to 10 thousand. Bhagirath has always been quite insistent of two things in rural development. One is schemes based on demand. Secondly, Bhagirath demands 50 % of public / crowd funding. These factors don't only ensure participation of the residents of the village but also imbibe economic equality as a habit.

Shri. Nilesh Ugavekar, Supervisor of the Agriculture Department conducted a training regarding rice farming. The 6-week training programme had much more knowledge to offer to the farmers. Nivaje Village has 300 acres under SRI. The SRI method of rice farming has triggered an increase in the production. Earlier they could get 34 kg per guntha, now they get 70-80 kg per guntha. The village received a sum of 10 lakh rupees to buy agricultural equipments such as power tiller, rice farming machine and grass cutter under the Chanda to Banda scheme. The village will also be receiving a fund worth 25 lakh through a scheme of central government which aims at the development of dry farming. The village has made its mark on state as well as national level. The public representatives have participated in these initiatives. Along with this the village also hosted a group of 35 Australian students who has visited the village to study sustainable development and agro tourism as a part of cultural exchange programme. Mr. Raviraj and Mrs. Sayali Joshi of Authentica, Pune had organized the programme and the visit.
Nivaje 10_1  H

Development work is nothing but a mathematical equation and various factors in the society contribute to it. The government, people, banks, NGO all must come together and work in mutual co-ordination. We must understand that the elephant is a symbol of richness and wealth. The cycle of the nature doesn't perceive ant as small or elephant as big. Every being in the nature has a certain role to play. The size of the being and the difference in it is nothing but a perspective. We think that the society perceives cities and villages similarly. While cities are quickly identified as smart and wise, villages are seen as habitats of illiterate people. While working with the residents of Nivaje, we at Bhagirath had an opportunity to work with a group of people which was rich in experience. If we don't understand nature, it backfires with destruction but Nivaje and its residents have always tried to understand nature and have aimed at an eco-friendly and sustainable development.
Nivaje 11_1  H

We don't want to be stuck with one village for too long. We move to another village in 5 years and start there with a clean slate. Now Nivaje has a team of competent people. We are also looking forward to start working with a new village. Malvani, the local dialect has a famous proverb which goes as such: a son in law or a fish should not stay for more than 3 days. In the past it was believed that a monk should not stay in one village for too long. We at Bhagirath have practiced similar philosophy since inception. NGOs should work as support systems for the villages but villages should not rely on a continuous support system and should aim at self reliance in 3 to 5 years. The growing number of such self reliant, independent villages is the strength of our nation.

- Dr. Prasad Waman Deodhar

President, Bhagirath Gramvikas Pratisthan

Mobile No: 9422596500