राबणाऱ्या हातांना यंत्राची साथ

    
|

Bhagirath 1_1        ३ वर्षापूर्वी साळगाव परिसरातून वाहणाऱ्या ओहोळातील जलयुक्त शिवार योजनेमधून गाळ काढणे व बंधारा घालणे या २ कामांनंतर वाढलेल्या जलसाठयाचा सिंचनाकरिता उपयोग कसा करावा यासाठी श्री. अरुण अनंत हळदणकर, श्री. सुखानंद रमेश हळदणकर, श्री. उल्हास जगन्नाथ हळदणकर, श्री. प्रदीप बाबू हळदणकर, श्री. केतन मारुती हळदणकर, श्री. सुभाष नारायण धुरी यांच्याशी संवादानंतर एकत्रित शेती करण्यासाठी ‘भगीरथ’ने पाईपलाइन दिली. तेथून सुरू झालेल्या सवांदामुळे शेतीमधील यांत्रिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
Bhagirath 2_1  

काल श्री. अरुण हळदणकर यांनी रु. ८०,०००/- किंमतीचा किसान क्राफ्टचा पॉवर ट्रीलर आणला. नांगरणी सोबतच ८५० किलो वजन वाहून नेण्याची याची क्षमता आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना या सोयीचा फायदा होणार आहे. कोकणातील तुकड्या-तुकड्यांची शेती, अपुरे होत चाललेले मनुष्यबळ या सर्वांचा एकत्रित परिणाम ३ महिन्याच्या भात पिकावर होतो. या साऱ्याला ‘भगीरथ’ने उत्तर शोधले. अवघ्या १० मिनिटांमध्ये शेतकऱ्याकडे जेवढी रक्कम असेल त्यामध्ये ‘भगीरथ’ आपला स्वनिधी देते व त्यामुळे शेतकऱ्यांचे यंत्र घेण्याचे स्वप्न साकार होते. एका वर्षामध्ये हा निधी शेतकरी पुन्हा संस्थेच्या गंगाजळीमध्ये जमा करतो. या योजनेचा फायदा अनेक शेतकरी गटांनी घेतला आहे. आतापर्यंत मदत म्हणून घेतलेला निधी १००% संस्थेकडे परत आला आहे. यावर्षी एकूण २ शेतकऱ्यांना (श्री. अरुण हळदणकर व श्री. गंगाधर हळदणकर) पॉवर ट्रीलर घेण्यासाठी अशाप्रकारची मदत संस्थेकडून करण्यात आली.
Bhagirath 3_1