कौशल्य विकासाचा आदर्श नरेश नाईक

    
|


Bhagirath - 1_1 &nbs

         श्री. नरेश साबाजी नाईक, मु. पो. माणगाव, ता. कुडाळ एवढीच नरेशची ओळख पुरेशी नाही. १६ वर्षांमध्ये त्याने रोज रु. ३०/- पासून ते रोज रु. ६००/- मिळविण्यासाठी खडतर प्रवास केला आहे. १० वी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने सायकल दुरुस्तीचे कौशल्य आत्मसात केले. मिळालेल्या पैशातून त्याने ३०० sq. ft. च्या २ पोल्ट्री शेड्स बांधल्या. सध्या त्याच्याकडे ४०० पक्षी आहेत. ‘भगीरथ’च्या प्रशिक्षण केंद्रामध्ये कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रशिक्षण घेतल्यामुळे आता सायकल दुरुस्तीबरोबरच कुक्कुटपालनाचा विस्तार करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँकेकडून रु. ५०,०००/- चे कर्ज मिळण्याबाबतच्या शिफारशीसाठी नरेश आज ‘भगीरथ’मध्ये आला होता. अशा लोकांमध्ये अनेक वर्षे काम केल्यानंतर निर्माण झालेला आत्मविश्वास हा खुपच प्रेरणादायी असतो. दरमहा ३ ते ४ हजार रुपये बँकेच्या कर्जाची परतफेड करणे त्यांना सहज शक्य असते. मग हळुहळु यांची बँकेतील पत ही लाख, दोन लाख होते. ‘भगीरथ’मध्ये रोज कोण ना कोणीतरी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे ठरवून येत असतात. अशी रोजगार निर्मिती जर गावांगावात झाली, तर शहरातील गर्दी कमी होईल. शाश्वत रोजगार देणाऱ्या ग्रामविकासाची दृष्टी देणाऱ्या संस्था, व्यक्ती यांची संख्या व संवेदनशीलता जलद गतीने वाढण्याची गरज आहे.