“सेंद्रिय शेतीची मशागत मनामध्ये प्रथम करावी लागते” - श्री. धनंजय गोळम (शेतीतज्ञ)

    
|


Bhagirath - 1_1 &nbs        काल दिनांक १५/०१/२०२१ रोजी केळूस
(कालवी बंदर) येथील प्रयोगशील शेतकरी श्री. लक्ष्मण (आबा) वराडकर व सहकाऱ्यांची भेट झाली. यावेळी श्री. पांडुरंग शिवलकर म्हणाले की, ५ वर्षांपूर्वी त्यांनी सेलम जातीच्या हळदीचे १ किलो बियाणे लावले होते. गतवर्षी १२ किलो हळद पावडरचे उत्पादन मिळाले.
Bhagirath - 2_1 &nbs

SRI भातशेतीची त्यांना शास्त्रीयदृष्ट्या ओळख झालेली आहे. कोनोविडरच्या वापरामुळे आंतरमशागत सोपी झाली आहे. प्राणी, पक्षी, किडे, मुंगी हे सारेच निसर्गामध्ये असतात. भातशेतीवर येणाऱ्या किडरोगासाठी रासायनिक फवारणी करण्याऐवजी भातशेतामध्ये त्यांनी ‘पक्षी थांबे’ बांधले. शेताच्या मध्यभागी हे पक्षी थांबे आहेत. त्यामुळे यावर बसून पक्ष्यांना किडं नक्की कुठे आहे याचे निरीक्षण करणे व तिला अचूक टिपणे सोयीचे पडते. ही साधी सोपी गोष्ट कृषी तज्ञाने सांगितली व शेतकऱ्यांनी ती समजून घेतली, तर परस्परावलंबनाचे एक चक्र पूर्ण होते. निसर्गामध्ये अनुकूल व्यवस्था उभ्या केल्यास प्रश्नांची उत्तरे सापडू शकतात. नंतर एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला अधिक चांगल्याप्रकारे समजावू शकतो.
Bhagirath - 3_1 &nbs

भुईमूगाचे उत्पन्न वाढविण्यासाठी आजरा येथील केलेल्या प्रयोगाचा अभ्यास करण्यासाठी पुढील आठवड्यात २० शेतकरी जाणार आहेत. या अभ्यासदौऱ्यामध्ये ५०% महिला शेतकरी असतील. भुईमूगाचे बिजोत्पादन दशक्रोशीमध्ये करता येईल का?, याचीही चर्चा झाली. शेतकऱ्याच्या अंगणामध्ये जेव्हा शेतीतज्ञ पोहोचतात, तेव्हा तिथे ‘भगीरथाची विकास गंगा’ अवतरते. या साऱ्या विचार परिवर्तनाचे श्रेय हे श्री. धनंजय गोळम (शेतीतज्ञ), श्री. राजू गव्हाणे (कृषी सेवक), श्री. अभय भिडे, श्री. लक्ष्मण (आबा) वराडकर यांना जाते. या साऱ्यांनी एकत्रितपणे केलेला सेंद्रिय शेतीचा विचार जोम धरत आहे. म्हणूनच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बदल हा प्रथम विचारामध्ये व नंतर वास्तवामध्ये होतो. शाश्वत विकासासाठी विचार वृक्षाची मुळे पक्की होणे व खोलवर जाणे गरजेचे असते.
Bhagirath - 4_1 &nbs