ईको-फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धा संपन्न

    
|


Bhagirath - 1_1 &nbs       दि. १८, १९ व २० फेब्रुवारी २०२१ रोजी भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे जिल्हास्तरीय पर्यावरणपूरक गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धा संपन्न झाली. एकूण ९० गणेश मूर्ती प्रदर्शनासाठी आल्या होत्या. सिंधुदुर्गमध्ये ८० हजार गणपती घरोघरी पुजले जातात. ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’मुळे जलसाठ्यांचे संतुलन बिघडते. त्याला उपाय म्हणून पर्यावरणपूरक माती, गोमय, कागदी लगदा, गोंद व निसर्गामध्ये आढळणाऱ्या घटकांपासून बनविलेले रंग यांचा विवेकपूर्ण वापर व्हावा यासाठी गेली ३ वर्षे प्रबोधन, प्रशिक्षण हे उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबविण्यात आले. एकूण ३०० मूर्तीकारांना या उपक्रमामध्ये प्रशिक्षित केले आहे.
Bhagirath - 2_1 &nbs

गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँकेने एकूण ३ कोटी रुपयांचे कर्ज मूर्तीकारांना दिले. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी देशामध्ये नावलौकिकास यावा व या आधारे येथील अर्थव्यवस्था सुधारावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मूर्तीकार संघ, सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँक व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान कार्यरत आहेत.
Bhagirath - 3_1 &nbs