विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा संपन्न

    
|


Science Workshop 2_1          विज्ञान शिकताना वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे हे खूप महत्त्वाचे असते. बरेचदा प्रयोगासाठी लागणारे साहित्य उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनामध्ये अडचणी निर्माण होतात. यासाठीच ‘Yes Foundation’ प्रायोजित आणि ‘अनुभूती लर्निंग सोल्युशन्स’ व ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान साहित्याचे वितरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० हायस्कूलना केले होते.

Science Workshop 3_1           विज्ञान साहित्य वापरावे कसे व त्यामागील मुलभूत सिद्धांत कोणता या विषयाची कार्यशाळाही दिनांक १७ जुलै २०२१ रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेत उपस्थित विज्ञान शिक्षकांना ‘अनुभूती लर्निंग सोल्युशन्स’चे श्री. संदीप दामले व श्री. धवल नागर यांनी मार्गदर्शन केले.
Science Workshop 1_1