दामू तोडणकर, मालवण यांच्या ‘विघ्नहर्ता आपत्कालीन ग्रुप’ला ‘भगीरथ’ची मदत

    
|
Work 1_1  H x W

आपत्कालीन मदतीसाठी सदैव तयार असणारे मालवण येथील श्री. दामोदर (दामू) तोडणकर व त्यांचे मित्रमंडळ हे गेली अनेक वर्षे निस्वार्थपणे मदत कार्य करत आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही ठिकाणी जाऊन बचावकार्य करण्यास व लोकांवर आलेले विघ्न तातडीने दूर करण्यासाठी तोडणकर यांची टीम नेहमीच सज्ज असते. दि. १५ ऑगस्ट २०२१ स्वातंत्र्यदिनी मालवण येथे त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांना लागणारे रुपये १ लाख किंमतीचे साहित्य (लाईफ जॅकेट्स, वॉकीटॉकी संचटीशर्ट, रींग बोया, रेस्क्यू ट्यूब, रस्सी) प्रदान करण्यात आले.Work 2_1  H x W         पूर, वादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये तेथील लोकांचे रक्षण करण्यासाठी कुणीतरी पुढे येऊन मदत करण्याची गरज असते आणि हे काम मालवण येथील मच्छीमार व पर्यटन व्यावसायिक ‘विघ्नहर्ता आपत्कालीन ग्रुप’च्या माध्यमातून करत आहेत. आपत्तीमध्ये लोकांचे जीव वाचवणे व त्यांना सुरक्षित ठिकाणी नेणे या बचावकार्यासाठी चांगल्या प्रतीच्या बचाव साहित्याची आवश्यकता असते, तसेच या परिस्थितीमध्ये पुढाकार घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवाची सुरक्षितताही महत्त्वाची असते. बचावकार्यावेळी अशाप्रकारच्या साहित्याची कमतरता भासू नये, अपुऱ्या साहित्यामुळे आपत्तीग्रस्त व बचाव करणारा कार्यकर्ता या दोघांचा जीव धोक्यात येऊ नये या उद्देशाने ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’कडून हे साहित्य वितरीत करण्यात आले.Work 3_1  H x W         बचावकार्य साहित्य वितरण कार्यक्रमाला डॉ. सुभाष दिघे, श्री. अजय पाटणे (तहसीलदार, तालुका मालवण), मत्स्य उद्योजक श्री. अशोक सारंग, ‘भगीरथ प्रतिष्ठान’चे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, ‘विघ्नहर्ता आपत्कालीन ग्रुप’चे सर्व सहकारी हे उपस्थित होते.