अर्थचक्र सुरु होण्यासाठी चिपळूणला शिवणयंत्र वितरण

    
|
 Chiplun 1_1  H        
         चिपळूण येथील पुरामध्ये घरगुती शिवणकाम करणाऱ्या महिलांच्या शिलाई मशिन खराब झाल्या होत्या. ‘राष्ट्र सेविका समिती’च्या पुढाकारातून एकूण ४३ महिलांना शिवणयंत्रे देण्यात आली. यापैकी ७ शिवणयंत्रांसाठी ‘भगीरथ’ने मदत केली. उपजीविकेची साधने उपलब्ध झाली की, महिलेला लढण्याचे व जगण्याचे बळ येते. चतुरंग प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेनेही ७ महिलांना शिवणयंत्रे दिली. नैसर्गिक आपत्तीमध्ये स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित काम करणे ही काळाची गरज असते. सर्व प्रश्नांची उत्तरे एकट्याने शोधण्यापेक्षा ‘समूहा’ने अधिक प्रश्नांची उकल होऊ शकते. सदर कार्यक्रमासाठी ‘भगीरथ’च्या प्रतिनिधी सौ. मिनल ओक उपस्थित होत्या.
Chiplun 2_1  H
 
Chiplun 3_1  H