शिकण्याची पद्धत ‘स्मार्ट’ होण्यासाठी...

    
|

 Smart TV Distribution 1

      टेसा टेप्स इंडिया प्राय. लि., मुंबई या कंपनीच्या आर्थिक मदतीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २० शाळांना One Plus कंपनीचा ४३ इंचाचा Android TV दि. १५ जानेवारी २०२२ रोजी ‘भगीरथ प्रतिष्ठान’च्या प्रांगणात प्रदान करण्यात आला. शिरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. शमशुद्दीन अत्तार सर यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळेला प्रारंभ झाला. तंत्रज्ञानाचा समुचित वापर करण्यासाठी शिक्षकांनी कोणता अभ्यास केला पाहिजे, यासाठीचे मार्गदर्शन श्री. अत्तार सरांनी यावेळी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांची डिजिटल शिक्षणासाठी २ दिवशीय कार्यशाळा पब्लिक स्कूल, आंबोली येथे घेण्याचे नियोजन करण्यात आले.

Smart TV Distribution 2