पिगरी उद्योगावरील अभ्यास : ग्रामीण अर्थव्यवस्थेतील उदयोन्मुख संधी

या अभ्यासाचा उद्देश म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील डुक्करपालन व्यवसायाची सध्याची स्थिती, त्यातील आव्हाने आणि भविष्यातील संधी ओळखणे.

    
|

पिगरी उद्योगावरील अभ्यास : ग्रामीण अर्थव्यवस्थेतील उदयोन्मुख संधी

गेल्या महिन्याभरापासून SP जैन मॅनेजमेंट कॉलेज, मुंबई येथील तीन विद्यार्थी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान सोबत “Piggery” या व्यवसायाचा SWOT Analysis करण्यासाठी जिल्ह्यात कार्यरत आहेत. या अभ्यासाचा उद्देश म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील डुक्करपालन व्यवसायाची सध्याची स्थिती, त्यातील आव्हाने आणि भविष्यातील संधी ओळखणे. 


Piggery1 

जिल्ह्यातील पिगरीची सद्यस्थिती
समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या जिल्ह्यात एकूण ५५ पिगरी शेतकरी कार्यरत आहेत. प्रत्येक शेतकरी सरासरी २५० डुक्कर पाळतो, आणि प्रामुख्याने व्हाईट यॉर्कशायर (White Yorkshire) ही जात पाळली जाते. ही जात युरोपमध्ये अत्यंत लोकप्रिय असून, उच्च दर्जाचे मांस आणि उत्तम वाढीच्या गुणधर्मांमुळे भारतातही तिची मागणी वाढत आहे.

शेतकऱ्यांना या व्यवसायातून सरासरी दरवर्षी १० लाख रुपयांचा नफा मिळत आहे. ही नफा क्षमता पाहता, पिगरी हा ग्रामीण भागातील उत्तम रोजगारनिर्मितीचा आणि स्थिर उत्पन्नाचा स्रोत ठरत आहे.

SWOT Analysis म्हणजे काय?

SWOT Analysis म्हणजे कोणत्याही व्यवसायाचे किंवा प्रकल्पाचे सखोल परीक्षण. यात चार घटकांचा अभ्यास केला जातो:

S – Strengths (बळकट बाजू): उदा. पिगरीमध्ये Feed Conversion Ratio सर्वाधिक असल्याने खाद्याचे रूपांतर मांसात जलद होते.
W – Weaknesses (कमकुवत बाजू): बाजारपेठेची अस्थिरता किंवा रोग नियंत्रणातील आव्हाने आणि एकूणच piggery ह्या व्यवसायाबद्दल लोकांचे असणारे मत.
O – Opportunities (संधी): प्रोटीनच्या वाढत्या मागणीमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी संधी उपलब्ध.
T – Threats (धोके): रोगप्रसार, फीडच्या किमतीत होणारी वाढ, किंवा पर्यावरणीय नियमांमुळे निर्माण होणारी बंधने.

या अभ्यासामुळे व्यवसायाच्या प्रत्येक अंगाचा विचारपूर्वक विकास करता येतो.

पिगरीचा वैज्ञानिक आणि आर्थिक दृष्टिकोन

प्रोटीनची वाढती गरज लक्षात घेता, precise protein production म्हणजे जैविकदृष्ट्या कार्यक्षम पद्धतीने प्रोटीन निर्मिती हा भविष्यातील महत्वाचा विषय ठरू शकतो.
प्राण्यांच्या Feed Conversion Ratio (FCR) बाबतीत पाहिल्यास — हत्तीमध्ये हा सर्वात कमी, तर पिगमध्ये सर्वाधिक असतो. म्हणजेच, दिलेल्या खाद्याचे प्रमाण सर्वाधिक कार्यक्षमतेने मांसात रूपांतर करणारा प्राणी म्हणजे डुक्कर.

ईशान्य भारतात, विशेषतः आसाम राज्यात, राष्ट्रीय डुक्कर संशोधन केंद्र (National Research Centre on Pig) कार्यरत आहे. तिथे जातींचे सुधारणा, रोग नियंत्रण, आणि मांस उत्पादन कार्यक्षमतेवर उच्च दर्जाचे संशोधन सुरू आहे. या संस्थेचे ज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते.


पिगरी वेस्टचा वापर : नव्या दिशेने वाटचाल
काल झालेल्या चर्चेत एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समोर आला. कर्नाटक फॉरेस्ट डिपार्टमेंटचे निवृत्त DFO यांनी सांगितले की, piggery waste म्हणजे डुक्करांच्या विष्टेचा वापर वन नर्सरीच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.

या वेस्टमध्ये जैविक घटकांचे प्रमाण जास्त असल्यामुळे झाडांच्या linear growth ला मोठी चालना मिळते. त्यामुळे, पिगरी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनातील उपउत्पादनाचा (by-product) सुद्धा आर्थिक आणि पर्यावरणपूरक वापर करता येऊ शकतो.


Piggery2 

पुढील दिशा

दिवाळीनंतर या विषयावर पशुवैद्यक तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा होणार आहे. पिगरीच्या जैवउत्पादनांचा वापर शेती, नर्सरी आणि पर्यावरणपूरक खतनिर्मितीत कसा वाढवता येईल यावर आता पुढील नियोजन केले जाईल.

गोवा हा आपल्या जिल्ह्याचा जवळचा आणि विकसित बाजार असल्याने, मांस आणि प्रक्रिया उद्योगांसाठी ते एक महत्त्वाचे लक्ष्य बाजारपेठ केंद्र ठरू शकते.

पिगरी हा व्यवसाय, आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत प्रोटीन उत्पादन, जैविक कचरा व्यवस्थापन आणि मूल्यवर्धनाचे एक सशक्त मॉडेल ठरू शकतो. SP जैन मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेला हा SWOT अभ्यास भविष्यात ग्रामीण शेतकऱ्यांसाठी शाश्वत आणि नफा देणाऱ्या पिगरी उद्योगाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरेल.