ग्रामीण विकासात युवकांची भूमिका

    
|
ग्रामीण विकासात युवकांची भूमिका:

Chara Vaatap 
ग्रामीण विकासाचे भविष्य हे युवकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असते. रानबांबुली गावातील हे युवक त्या बदलाचे उदाहरण आहेत. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या मदतीने त्यांना नेपियर चारा पिकाचे ठोंब/बियाणे उपलब्ध करून देण्यात आले.
दूध व्यवसायात चारा हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. एकूण उत्पादन खर्चापैकी जवळपास ६० टक्के खर्च चाऱ्यावर होतो. हा चारा जर शेतकऱ्यांनी स्वतः तयार केला, तर उत्पादन खर्चात मोठी बचत होते आणि नफा अधिक मिळतो.
भगीरथ प्रतिष्ठान अशा अनेक लहान प्रयोगांद्वारे मोठे बदल घडवत आहे. युवकांना संधी देत, त्यांच्यातील उद्योजकता आणि नेतृत्वगुणांना दिशा देत, संस्था खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलत आहे.