कुक्कुटपालन प्रशिक्षण: प्रमाणपत्र वितरण

    


UPNRM प्रकल्पाअंतर्गत घेतलेल्या कुक्कुटपालन प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम. डॉ. बापू भोगटे व सहकारी प्रशिक्षक यांच्यामुळे सर्वांना कोंबडी पालनाचे अर्थशास्त्र समजले. कोंबडी हे शेतकऱ्याचे ATM कार्ड झाले आहे. UPNRM प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत एकूण ७ प्रशिक्षणामधून १७० प्रशिक्षणार्थींना कुक्कुटपालन प्रशिक्षण देण्यात आले. यातील ४० शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केला आहे. कुक्कुटपालन प्रशिक्षण घेऊन श्री. एकनाथ परब (गाव खवणे, ता. वेंगुर्ला) यांनी २५०० कोंबडी पाळायला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी ७ बॅचेस काढल्या आहेत. या व्यवसायासाठी २ लाख रुपयांचे कर्जप्रकरण आता ते करणार आहेत.