'धुरमूक्त गावा' साठी अभ्यासदौऱ्याला सहमती

    


गाव नानेली - नवीन गावातील काम

नानेली गावातील स्वयंसहाय्यता गटातील महिला हात उंचावून 'धुरमूक्त गावा'साठी अभ्यासदौऱ्याला सहमती देताना दिसत आहेत. सर्वांचे सरासरी शिक्षण ५ वी पर्यंत आहे, पण शहाणपणा, समजूतदारपणा बचत गटामुळे वाढत आहे. दरमहा ७ तारिखला दुपारी सर्वजणी जमतात व गावविकासाबाबत अनेक विषयांवर चर्चा करतात. 'भगीरथ' च्या कार्यालयाला भेट देऊन या महिलांनी विविध प्रकल्पांची माहिती समजावून घेतली. एकूण ७ बायोगॅसचे काम येथे सुरु झाले आहे. सर्वांनी यासाठी जिल्हा बँकेकडून १६,०००/- रुपयांचे कर्ज घेतले आहे. आपण यांना ५०% अनुदानावर शेगडी दिली आहे. या गावाचा आता आपण सर्वे करणार आहोत.