NABARD च्या अधिकाऱ्यांची ‘भगीरथ प्रतिष्ठान’ला भेट

    

दिनांक २७ जून २०१६ रोजी UPNRM (Umbrella Programme for Natural Resource Managment) या प्रकल्पांतर्गत देशाच्या वेगवेगळ्या भागातील NABARD च्या अधिकाऱ्यांनी भगीरथ प्रतिष्ठानच्या कार्यालयाला तसेच झाराप खानमोहल्ला येथील पाकिजा बचत गटाला देखील त्यांनी भेट दिली. या गटातील सर्व सदस्यांनी दुग्धव्यवसाय व बायोगॅस केलेले आहेत.  


यावेळी देशभरातील NABARD चे अधिकारी, NABARD चे जिल्हा प्रबंधक मान. श्रीम. राजश्री मानकामे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान. श्री. अनिरुद्ध देसाई, जिल्हा बँकेचे मान. श्री. प्रमोद गावडे, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर आणि वेगवेगळ्या व्यवसायात ज्यांनी आपला ठसा उमटवला असे शेतकरी उपस्थित होते.