ज्या घरात बायोगॅस, त्याना प्रेशर कुकर: उत्पादक कामांसाठी मिळाला वेळ

    

धूरमुक्त जिल्हा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ...

भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ५५०० हून अधिक बायोगॅस बांधले आहेत. फक्त बायोगॅस बांधून न थांबता ज्या घरात बायोगॅस आहे अशा कुटुंबांतील महिलांचा जेवण करण्याचा वेळ वाचवा आणि वाचलेला वेळ हा उत्पादक कामांमध्ये वापरता यावा यासाठी प्रेशर कुकरही दिले.

यावर्षी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, गोरेगाव यांनी प्रेशर कुकरसाठी आर्थिक मदत केली. यातून हॉकिन्स या नामांकित कंपनीचे १० लिटर क्षमतेचे ११३ प्रेशर कुकर १९ गावांमध्ये वितरीत करण्यात आले. दि. १२ एप्रिल २०१६ रोजी निवजे गावामध्ये श्री. सुरेश गुणाजी शिंदे यांच्या घरी प्रेशर कुकर वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबईचे मान. श्री. विवेक कायंदे (उप प्रबंधक परियोजना (शिक्षा) सी.एस.आर.), निवजे गावचे सरपंच मान. श्री. समीर पिंगुळकर, पंचायत समिती कुडाळचे कृषी अधिकारी मान. श्री. सुधाकर जाधव, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माणगाव शाखेचे शाखाधिकारी श्री. रानडे, ग्रामसेविका मान. श्रीम. कोनकर, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, निवजे येथील कार्यकर्ते श्री. दत्ता सावंत आणि बायोगॅस धारक ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.