भात लागवडीची ‘श्री’ पद्धत

    

भाताच्या सुधारित SRI (System of Rice Intencification) अर्थात सघन पद्धतीची भात लागवडीमुळे भात उत्पादकांना कमी खर्चात, कमी वेळेत तसेच मजुरी, बियाणे व निविष्ठांत बचत होवून उत्पादन वाढविणे शक्य झाले आहे.

या भात लागवडीचे प्रयोग श्री. आनंद हळदणकर, झाराप यांच्या शेतात तसेच निवजे (ता. कुडाळ) गावातील मान. श्री. समीर पिंगुळकर यांच्या शेतामध्ये करण्यात आले. यावेळी मान. श्री. प्रमोद केळुसकर (कृषी विभाग, वेंगुर्ला) आणि मान. श्री. धनंजय गोळम (M.Sc., Horti.) यांनी मार्गदर्शन केले.