सितारा मिरचीने गाठली सिताऱ्यांसारखी ऊंची

    

“सितारा मिरचीने गाठली सिताऱ्यांसारखी ऊंची, मुलांच्या कष्टाला कुठली वापरावी मोजपट्टी.” हे श्री. दिपक सामंत सरांचे म्हणणे तंतोतंत खरे आहे. माड्याचीवाडी हायस्कूल हे शेतीच्या विविध प्रयोगांचे केंद्र बनले आहे.


सितारा जातीच्या मिरचीची लागवड प्लास्टिक मल्चिंग पध्दतीने केली आहे. मिरचीची लांबी १८ सें.मी. एवढी आहे. ILFS, मुंबई व सावली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या आर्थिक सहकार्यातून आणि श्री. नारायण चेंदवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलं शेतीचे धडे शिकत आहेत.