@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@
कुक्कुटपालन: ग्रामीण विकासाचे सर्वात प्रभावी Growth Engine
फोटोतील 'हम पांच' म्हणजे श्री. मधुसूदन कांदे (हुमरस), श्री. न्हानू नाईक (न्हावेली), श्री. दिनेश मेस्त्री (कसवण), श्री. मनोहर ठिकार (कोलगाव), श्री. मोजेस रॉड्रीक्स (कोलगाव) यांना डिबीकिंग मशिन (चोच कापण्याचे यंत्र) ५०% अनुदानावर 'भगीरथ'ने दिले.
कुक्कुटपालन हे ग्रामीण विकासाचे सर्वात प्रभावी Growth Engine असते. याच अर्थशास्त्रीय वृद्धीमुळे कोंबडीला परसबागेतील लक्ष्मी म्हणतात.
कुक्कुटपालनामध्ये ब्रूडिंग सेंटर हे नर्सरीसारखे असते. हॅचरीमधून जन्माला आलेली पिल्ले १ महिना ब्रूडिंग सेंटरमध्ये वाढवली जातात. लासोटा, गंबोरो, मरेक्स यांसारखे लसीकरण पूर्ण केले जाते. पिल्ले (वजन ४० ग्रॅम) १ महिना वाढल्यावर त्यांचे वजन ३०० ते ४०० ग्रॅम होते. यानंतर बचतगटातील महिला व शेतकरी यांना पिल्ले वाढविणे सोपे जाते. यामुळे मरतूक होत नाही. वाढीच्या प्राथमिक वयामध्ये संतुलित खाद्य मिळाल्यामुळे अशा पक्षांची अंडी व मांस देण्याची उत्पादकता सर्वाधिक असते.