प्रशिक्षणामधून प्रशिक्षक घडवण्याचा संकल्प

    

 

 

प्रशिक्षणामधून प्रशिक्षक घडवण्याचा संकल्प

भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान येथे गाव पातळीवर विविध विषयांसाठी निगडीत प्रशिक्षक कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणास प्रशिक्षकांचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी श्री. विवेक अत्रे (पुणे) उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रशिक्षक कसा असावा? त्याच्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत? कामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असावा? प्रशिक्षण देताना मर्यादा आणि वेळेचे बंधन का पाळले पाहिजे,प्रशिक्षकाने दरवर्षी किमान १५ दिवस विविध विषयांवर आपल्या ज्ञानवृद्धीकरिता स्वतः प्रशिक्षण घेतले पाहिजे, इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
प्रशिक्षणास उपस्थित कार्यकर्त्यांनी गावपातळीवर काम करत असताना आपणास आलेल्या अनुभवांची माहिती यावेळी दिली.

डॉ. प्रसाद देवधर यांनी काहीतरी वेगळे करण्यापेक्षा काहीतरी चांगलंं करण्याचा सल्ला प्रशिक्षणास उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. माणसे पुढे येण्यापेक्षा काम पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला.