ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेशर कुकर योजना....

    

प्रेशर कुकर योजना....

गेल्या २ महिन्यामध्ये एकूण ८०० महिलांना कुकर वापरण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. हॉकिन्स कंपनीने या प्रकल्पासाठी CSR मधून मदत केली. पुढील गावांमध्ये कार्यक्रम करण्यात आले. झाराप, नेमळे, हुमरस, कोलगाव, कुशेवाडा, न्हावेली, तळवणे, निरुखे, आवळेगाव, तांबोळी, माणगाव, गिरगाव – कुसगाव, बांदा, कोनशी, शिरोडा, खरारे – पेंडूर, कसाल, मोरे, आंबेगाव, हिर्लोक, निवजे, पोखरण, माडखोल,  इ. गावातील महिलांना या योजनेचा उपयोग झाला. 


ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाक घरातील धुराचा त्रास कमी व्हावा म्हणून बायोगॅस व प्रेशर कुकर असा संयुक्त कार्यक्रम भगीरथ करते. प्रेशर कुकरमुळे जेवण करण्याचा वेळ वाचतो. या वाचलेल्या वेळाचा आर्थिक उत्पन्न वाढीसाठीचा एक कृती कार्यक्रम भगीरथने तयार केला. कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय या उपक्रमांची श्रुंखला व त्यासाठीचा कर्ज पुरवठा यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होत आहेत.