शालेय इमारत नूतनीकरणास प्रारंभ

    


 

हळदीचे नेरूर गावातील ग्रामस्थ, रोटरी क्लब ऑफ कुडाळ व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून हळदीचे नेरूर हायस्कूलच्या शालेय प्रार्थना हॉलचे नूतनीकरण करण्यास प्रारंभ झाला. एकूण ४ लाख रुपयांचा निधी व श्रमदान यासाठी अपेक्षित आहे.


 

हळदीचे नेरूर ही दुर्गम भागातील शाळा आहे. दशक्रोशीतून २२० विद्यार्थी–विद्यार्थिनी येथे शिक्षणासाठी येतात. ग्रामस्थांनी श्रमदानातून ही इमारत बांधली होती. नवीन पिढी याच इमारतीचे नूतनीकरण करत आहे.


 

संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळा सावंत, डॉ. विष्णू कविटकर, श्री. प्रमोद म्हाडगुत, श्री. अरुण म्हाडगुत, श्री. संजय कविटकर यांच्यासोबत रोटरीचे डॉ. रविंद्र जोशी, श्री. गजानन कांदळगावकर, श्री. प्रमोद भोगटे हे निधी संकलनाचे काम करणार आहेत.