मधुमक्षिकापालनाची गोड गोष्ट

    

शेतीपूरक उद्योगामध्ये मधुमक्षिकापालन संदर्भातील प्रयोग श्री. नारायण चेंदवणकर (गाव - बाव-बांबुळी) हे करत आहेत. मधुमक्षिकापालनातील पेटीचे व मधमाशांचे आरोग्य तपासणे हे जबाबदारीचे काम असते. जंगलातील सातेरी जातीचे मधमाशांचे पोळे शोधून त्यांची कॉलनी पेटीमध्ये स्थिर करणे यासारखेचे प्रयोग श्री. नारायण चेंदवणकर करत आहेत. मधुमक्षिकापालनामुळे फळबागांचे उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढू शकते.

 

      कोकणातील शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यसाय यांसोबतच अशाप्रकारे मधुमक्षिकापालनाचे प्रयोग करणे हे सेंद्रिय शेतीसाठी गरजेचे आहे.