‘सायकल मेरी प्यारी’.... कु. अनुष्का विश्वनाथ गोडे, झाराप

    


 

              कु. अनुष्का ही इयत्ता ८ वी मध्ये शिकते. शाळेमध्ये चालत जाण्याचे रोजचे जाते-येते अंतर एकूण ३ कि.मी आहे. ‘भगीरथ’च्या योजनेतून तिला सायकल मिळाली असून, आता तिचा शाळेत चालत जाण्याचा वेळ वाचला आहे.         आतापर्यंत एकूण ७६ मुला-मुलींनी या सायकल योजनेचा लाभ घेतला आहे. दरमहा ‘भगीरथ’मध्ये सायकल लोकवर्गणी स्वरुपात ठराविक रक्कम जमा केली जाते. साधारणपणे दरमहा ३००/- ते ५००/- रुपये परतावा होत असतो. प्रारंभीची सर्व रक्कम ‘भगीरथ’ देते. सायकल घेण्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स व एक फोटो द्यावा लागतो. अवघ्या एका दिवसात सायकल मिळाल्यामुळे मुलगी व आई खूप खुश असतात.