शेळीचे नेमके वजन मोज काट्यावर समजल्यामुळे माझा फायदा झाला. - श्री. सागर सुकी, गाव आंबेरी

    

      शेतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये एकांगी पिक पद्धती धोक्याची ठरते, अशावेळी परस्परावलंबी शेतीपूरक उद्योग असल्यास तोटा होत नाही. शास्त्रीय परिभाषेमध्ये याला ‘Circular Economy’ म्हणतात. विकासाच्या प्रक्रियेमध्ये शाश्वतता महत्वाची ठरते.


 

शेळी, बकरा यांची वजनावर किंमत ठरते. जन्माच्या वेळी २ ते २.५ कि.ग्रॅ. वजन असते, तर साधारण १८ महिन्यानंतर त्याचे वजन २५-३० कि.ग्रॅ. होते. व्यापारी अंदाजे वजन पकडतो. साधारणपणे २५० रुपये प्रति कि.ग्रॅ. प्रमाणे शेतकऱ्याला पैसे मिळतात. श्री. सागर सुकींना वजनाचा काटा दिल्यामुळे पिल्लाच्या जन्मापासून विक्रीपर्यंत वजनाच्या नोंदी त्याने ठेवल्या आहेत. वजनातील अचूकता आल्यामुळे फायदाही वाढला आहे. सागरकडे ५५ शेळ्या आहेत. वर्षाकाठी १० ते १२ शेळ्यांची विक्री होते. लसीकरण, जंतनिर्मुलन, Mineral Mixture यांसाऱ्या शास्त्रीय पद्धतीमुळे सागर आदर्श शेळीपालक ठरत आहे. शेळीपालनाबरोबरच दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, विविध प्रकारची पिके हे शेतकरी कुटुंब घेते.


 

सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रयोगशील शेळीपालकांना ५० % अनुदानावर अशाप्रकारचे वजनकाटे भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान उपलब्ध करून देणार आहे.