माड्याचीवाडी हायस्कूलमधील... ‘कथा अकलेच्या कांद्याची’

    

            
                 शिक्षणामध्ये गणित, विज्ञान, इतिहास सोबतच शेतीचेही शास्त्रशुद्ध कृतीशील शिक्षण असेल, तर शाळेचा परिसर हा सृजनाचे हिरवे प्रयोग करू शकतो. माड्याचीवाडी हायस्कूलने IBT अंतर्गत श्री. नारायण चेंदवणकर या प्रगतशील शेतकऱ्याच्या मार्गदर्शनाखाली केलेली कांद्याची लागवड विद्यार्थी-विद्यार्थीनींना अधिक काही शिकवून गेली. पिकांच्या वाढीच्या अवस्था, पाण्याच्या पाळ्या, भरखत-वरखत या साऱ्या गोष्टी प्रत्यक्ष करतानाचा अनुभव हा पुस्तकी ज्ञानाला अधिक आधार देतो आणि मग, ‘शाळा हे परिवर्तनाचे माध्यम ठरते.’