“पर्यावरण पूरक गणेशमूर्ती कार्यशाळा”

    

दिनांक - २७ मे २०१९, वार – सोमवार, वेळ - सकाळी ९.३० ते ५.३०,

ठिकाण - सिद्धीविनायक मंगल कार्यालय, माजगाव-सावंतवाडी.


मळगाव येथील श्री. विलास मळगावकर (संपर्क क्र. ९४२२३७९६१९) यांनी कागदाचा लगदा, शाडू माती, गोंद व खडू पावडर यांच्या सुयोग्य मिश्रणातून मूर्त्या घडविल्या आहेत. फोटोग्राफमधील गणपतीची उंची १३ इंच एवढी असून, मूर्तीचे वजन १.८०० कि.ग्रॅ. आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मूर्तीकार संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यशाळा होणार आहे. दिवसेंदिवस गणपतीच्या मातीची उपलब्धता कमी होत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या या पर्यावरणाला पूरक नाहीत. यासाठी शोधलेला हा पर्याय अधिक कारागिरांना शिकविण्यासाठी कार्यशाळेचा उपयोग होईल. प्रशिक्षित मूर्तीकारांना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्जपुरवठा करणार आहे.

                सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण ८०,००० गणपतीच्या मूर्त्या बनविल्या जातात. या उद्योगामध्ये २,५०० छोटे–मोठे कारागीर गुंतले आहेत. कागदी लगद्यापासून गणपती मूर्तीबरोबरच पर्यटन व पर्यटकपूरक वस्तूंची निर्मिती केल्यास ३ महिन्यांऐवजी ६ महिने रोजगार मिळू शकेल.