@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ शाळेच्या अर्थकारणाला बांबूचा आधार

शाळेच्या अर्थकारणाला बांबूचा आधार


      भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व बांबू अभ्यासक श्री. मिलींद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरंबळ हायस्कूल परिसरामध्ये एकूण ७५ बांबूची बेटे बहरणार आहेत. सरंबळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. विवेकानंद बालम यांच्या टिमने श्रमदानाने बांबू लागवड केली आहे.

शाळेचा परिसर हिरवा होत असतानाच तो आर्थिकदृष्ट्या उत्पादकही झाला पाहिजे. मुलांना श्रमदानाचे महत्त्व, श्रमदानाची सवय त्याचबरोबर बांबू लागवडीचे विज्ञानही समजावे हा हेतू आहे. लागवडीनंतर ३ ते ४ वर्षांनी प्रती बांबूच्या बेटामागे ५ते ८ बांबू याप्रमाणे ४००/- रु. उत्पन्न मिळेल, म्हणजेच ७५ बेटातून ३०,०००/- रु. उत्पन्न शाळेला मिळेल.

ज्ञानाधारित शिक्षणाबरोबरच व्यवहारिक शिक्षणाची जोड मुलांना स्वत:च्या पायावर उभ करू  शकेल.