पर्यावरणपूरक गणपतीचा श्रीगणेशा

    

         गणपती शाळांसाठी दीड लाखाचे कर्ज १०.०५% व्याज दराने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण ९०,००० घरी गणपती विराजमान होतो. प्लास्टर ऑफ पॅरिसचा वाढता प्रभाव व दिवसेंदिवस मातीच्या खाणीमधील कमी होत जाणारी माती याला सक्षम पर्याय शोधणे गरजेचे होते. काय करू नको हे सांगण्यापेक्षा समाजाला काय करा ते सांगावे लागते. हाच प्रयत्न सर्वांच्या सहयोगातून झाला.

      सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मूर्तीकार संघटना व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या सहयोगातून २०० मूर्तीकारांच्या Eco Friendly गणपती बनविण्याच्या कार्यशाळा झाल्या. दिनांक २२, २३ जून २०१९ रोजी कुडाळ येथे एकूण ७० गणेश मूर्ती स्पर्धेसाठी आल्या होत्या.