“आमचा आनंद १००%” (Our Joy: 100 %)

    



 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब, होतकरू, हुशार मुलांची यशोगाथा व यातून सुरू झालेला ‘यांचा आनंद १००%’ हा उपक्रम गेली ८ वर्षे भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानमध्ये सुरु आहे. आतापर्यंत ४९२ विद्यार्थ्यांना रूपये १८,४१,७०८/- एवढी मदत भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, सेवा सहयोग फाउंडेशन व आम्ही बॅचलर व्हॉटस्अॅप ग्रुप यांच्याकडून करण्यात आली. 

         मदत ही छोटी किंवा मोठी नसते तर ती योग्यवेळी मिळणे खूप महत्त्वाचे असते. सुरूवातीच्या टप्प्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आता शिकून कमावतेही झाले आहेत. ‘मला जशी मदत मिळाली, तशी मदत सतत कोणाला तरी लागणार’, ही भावना कायम त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे आपापल्या क्षमतेनुसार ही मुले या निधीसाठी मदत करीत आहेत. या वर्षी कमल राजाध्यक्ष ट्रस्टने ३ लाख रुपयांची भरीव मदत या उपक्रमासाठी केली आहे.

Our Joy: 100 %

      The initiative, Our Joy: 100 %, begun to fund the dreams and efforts of economically poor yet academically brilliant children has just completed 8 years. In the 8 years, Bhagirath Gramvikas Pratishthaan, Seva Sahayog and a WhatsApp group called Aamhi Bachelors, have lent a help of Rs. 18, 41, 708/- among 492 children.

          No help is big or small. It is important that the help is provided at the right time. The early beneficiaries of the initiative have started earning but they know that someone will need help just like they did and these students are helping to raise the funds for the initiative. This year, The Kamal Rajadhyaksha Trust lent a constructive helping hand of 3 Lakh for the initiative.