शेतीमधील यांत्रिकीकरणाचा शुभारंभ

                चांदा ते बांदा योजनेतून निवजे शेतकरी गटाला शेतीमधील यांत्रिकीकरणाचा संच ७५% अनुदानावर वितरीत करण्यात आला.

         SRI पद्धतीने एकूण ५० शेतकरी भात लागवड करणार आहेत. गुंठ्याचे सरासरी भाताचे उत्पन्न ३५ किलो असते. SRI पद्धती व शेतीशाळा यामुळे सरासरी ७० किलोपर्यंत उत्पादन मिळेल. अनुभवी प्रगतशील शेतकरी ११० किलोपर्यंत उत्पादन घेत आहेत.