विकासाचे चक्र... शिवणयंत्र

    
|


Bhagirath - 1_1 &nbs     या महिन्यामध्ये श्रीम. संजना सिद्धेश चव्हाण (तेर्सेबांबार्डे, ता. कुडाळ), श्रीम. साक्षी संदेश कारिवडेकर (आंबेगाव, ता. सावंतवाडी) व श्रीम. अश्विनी अंकुश साटेलकर (तेर्सेबांबार्डे, ता. कुडाळ) या एकूण ३ महिलांना ‘भगीरथ’ने शिवणयंत्रासाठी मदत केली. शिवणयंत्रामुळे महिलांना घरच्या घरी रोजगार मिळतो. बरेचदा शिवणयंत्र घेण्यासाठी एकरकमी पैसे महिलेकडे नसतात. अशावेळी ‘भगीरथ’ त्या महिलेला मदत करते. यासाठी आधारकार्डाव्यतिरिक्त अन्य कोणतीही कागदपत्रे लागत नाहीत. शिवणयंत्रातून दरमहिना मिळणाऱ्या उत्पन्नातून ती महिला ‘भगीरथ’चे पैसे परत करते. अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने संवेदनशील भावनेतून केलेली मदत ती महिला परत तर करतेच, पण तिच्यासारख्या अन्य महिलांनाही ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्युक्त करते.
Bhagirath - 2_1 &nbs

Bhagirath - 3_1 &nbs