जिद्दीने कुक्कुटपालन करणारा ज्ञानेश्वर

    
|


Bhagirath - 1_1 &nbs          गाव गोठोस (भितयेवाडी) येथील ज्ञानेश्वर हा दिव्यांग आहे. शारीरिक कमतरतेचा बाऊ न करता कुक्कुटपालन प्रशिक्षणानंतर ज्ञानेश्वरने कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला आहे. आपल्या सोबतच आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडील अंडी जमा करून ती ‘अंडी उबवणूक केंद्रा’मध्ये पोहोचविण्याचे कामही तो करतो. फावल्यावेळात एका पतसंस्थेची पिग्मी गोळा करण्याचेही काम तो करतो. एखादे काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर प्रतिकूलतेवरही मात करता येते हा विश्वास ज्ञानेश्वर भेटल्यावर आला. श्री. मधुसूदन कांदे, श्री. प्रकाश राणे हे कुक्कुटपालक व भगीरथ संस्था त्याच्या या धडपडीला मदत करीत आहेत. ही मदत त्याला परावलंबी नाही तर स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम करीत आहे.
Bhagirath - 2_1 &nbs