कारीवडे गावातील ‘सोनचाफा’वाडी

21 Jul 2020 17:50:27


Bhagirath - 1 _1 &nb       कारीवडे गाव हे सावंतवाडी पासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर आहे. या गावामध्ये पाण्याची मुबलकता असल्यामुळे गावातील महिला भाजीपाला उत्पादन व विक्रीमध्ये पारंगत आहेत. वेलणकर सोनचाफा नर्सरीचे मालक श्री. उदय वेलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनचाफा लागवड व संगोपन कार्यशाळा घेण्यात आली. एकूण २० महिलांनी १०० सोनचाफ्याची कलमे लावण्याचे नियोजन केले. हा सोनचाफा वर्षभर फुले देतो. ‘उमेद’ अभियानाचे श्री. अभय भिडे आणि कारीवडे गावच्या सरपंच सौ. अपर्णा तळवणेकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. असाच प्रयोग ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ अन्य गावातही करणार आहे. छोट्या-छोट्या गोष्टी समूहाने एकत्रितपणे केल्यास काही कुटुंबांना रोजगाराच्या नवीन संधी मिळू शकतात.

Powered By Sangraha 9.0