‘मुरघास’ (सायलेज) प्रात्यक्षिक व चर्चासत्रे

    
|


Bhagirath - 1_1 &nbs         दुधाळ जनावरांसाठी ‘मुरघास’ या प्रक्रियायुक्त चाऱ्याचा दुध उत्पादन वाढीसाठी चांगला उपयोग होतो. मका लागवड ते मुरघास निर्मिती यासाठी निवजे, पुळास, माजगाव, आंबडपाल, माणगाव या गावांमध्ये शेतकरी मेळाव्यांचे आयोजन केले होते. ‘मुरघास’ हा विषय कोकणामध्ये नवीन आहे. चाऱ्याची उपलब्धता असताना भविष्यातील नियोजन करून चारा शास्त्रीय पद्धतीने मूल्यवर्धक करून ‘मुरघास’ साठविल्यास दुध उत्पादनामध्ये १५ ते २० टक्क्यांचा फरक पडतो. गतवर्षी एकूण २५ टन ‘मुरघास’ शेतकऱ्यांनी वापरले, त्यामुळे त्याचे महत्त्व शेतकऱ्यांना समजले आहे. बाजारभावाने ‘मुरघास’ खरेदी केल्यास ६/- रुपये किलो पडतो.
Bhagirath - 2_1 &nbs

  भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व डॉ. हेडगेवार प्रकल्प, माणगाव यांनी संयुक्तपणे ‘मुरघास’ बनविण्याचे मशिन (रु. ४.५० लाख) खरेदी केले आहे. सदर मशीन हे शेतकऱ्यांच्या बांधावर नेता येते. या मशीनद्वारे एका तासाला ८०० कि.ग्रॅ. मक्यावर प्रक्रिया केली जाते. ५० कि.ग्रॅ.च्या बॅगेमध्ये ‘मुरघास’ हवाबंद केले जाते. एका पिशवीला १००/- रुपये एवढा प्रक्रिया खर्च घेतला जातो. यावर्षी १०० टन ‘मुरघास’ करण्याचे नियोजन केले आहे.
Bhagirath - 3_1 &nbs