ओरोस सुधारगृहामध्ये पिकला श्रमाचा ‘भोपळा’

25 Feb 2021 11:06:09


Bhagirath - 1_1 &nbs

         ‘तुरुंग’ या शब्दाबद्दल सामान्य माणसाच्या मनामध्ये एक अनामिक भिती असते, पण शिक्षा भोगणारे कैदी हे सुद्धा तुमच्या आमच्या सारखीच माणसे असतात. विवेकाचे भान हरवल्यामुळे त्यांच्या हातून प्रमाद घडलेला असतो.

सुधारगृहामध्ये श्री. नारायण चेंदवणकर व कु. अवधूत देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली सुधारगृह प्रशासनाचे अधिकारी श्री. जाधवर, श्री. देवकाते, श्री. हडकर व सर्व कैद्यांनी मिळून श्रमदानाने सुधारगृहाचे नंदनवन करायचे ठरविले. ‘भोपळा’ या पिकाने सारा परिसर जिवंत झाला आहे, या सोबतच मिर्ची, वांगी, मका, केळी, शेवगा, पपई, दुधी भोपळा व भात या साऱ्यामुळे आपण एका समृद्ध शेतामध्ये उभे आहोत असा अनुभव येतो. “दो आँखे बारह हात” हा चित्रपट अशाचप्रकारच्या कामातून वास्तवामध्ये येतो. एका वर्षाच्या पिकाचे नियोजन केलेले आहे. सुधारगृहातील कैदी एक वेगळाच अनुभव घेत आहेत. ‘आहे तसा घ्या आणि हवा तसा घडवा’ हे म्हणणे सोपे असते, पण सर्वांच्या सहकार्याने हा परिवर्तनाचा ‘हरित प्रयोग’ यशस्वी होत आहे. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, रोटरी क्लब, कुडाळ यांचे आर्थिक सहकार्य व सर्व कैदी बांधवांचे श्रम यामुळे हे सारे शक्य झाले आहे.

Powered By Sangraha 9.0