अझोला शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल !

    
|


Bhagirath - 1_1 &nbs        ‘अझोला’ हे एक प्रकारचे शेवाळ असून, त्याचे शास्त्रीय नाव
Azolla pinnata’ हे आहे. ८ इंच खोल व ५ x १४ फुट खड्ड्यामध्ये प्लास्टिक आच्छादून केलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये ते वाढते. त्याच्या वाढीसाठी, पोषणद्रव्ये मिळण्यासाठी ताजे शेण, माती, खनिजद्रव्ये व सिंगल सुपर फॉस्फेट यामध्ये टाकले जाते. आठवड्यातून २ वेळा अझोला काढता येते. त्याच्या वाढीचा वेग उत्तम असल्यामुळे ५०% सूर्यप्रकाशामध्ये चांगले उत्पन्न मिळते. दुधाळ जनावरे, अंडी व मांस देणाऱ्या कोंबड्या यांसाठी हे उत्तम प्रकारचे खाद्य आहे. यामधील प्रथिनांचे प्रमाण २५ ते ३० % एवढे आहे. अंड्यातील पिवळा बलक व दुधाळ जनावरांचे फॅट यामुळे वाढते.
Bhagirath - 2_1 &nbs

       शेतकरी लोकांनी याचा योग्य उपयोग केल्यास परसबागेमध्ये चांगल्या प्रतीचे खाद्य बनविता येईल. छोटे छोटे प्रयोग करून स्वयंपूर्ण होणे ही काळाची गरज आहे. अझोला बेड बनविण्यासाठी १५० ते ५०० GSM जाडीचे प्लास्टिक लागते. ‘भगीरथ’ने यावर्षी ५० शेतकऱ्यांना प्लास्टिक खरेदीसाठी अनुदान द्यायचे ठरविले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पशुधन संशोधन केंद्र, निळेली येथील डॉ. विष्णू कविटकर यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.
Bhagirath - 3_1 &nbs