‘बायोगॅस’मुळे मी गोसेवा करू शकलो !

    
|

कुणीतरी असं म्हटलं होत की, पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही, तर पैसा व ज्ञान यांच्या भोवती फिरते. गाई-गुरे पाळा असे म्हणणे सोपे असते, पण अर्थशास्त्रीयदृष्ट्या ते परवडणारे नसेल तर ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशा संभ्रमामध्ये शेतकरी पडतो. झाराप गावातील रीक्षा व्यवसाय करणाऱ्या श्रीधर हरमलकरने १० वर्षांपूर्वी बांधलेला ‘बायोगॅस’ आत्ताही इंधनवाढीच्या समस्येचे उत्तर देत आहे.
Bhagirath - 1_1 &nbs

गेली १५ वर्षे श्रीधरकडे गाय आहे. या गाईने त्याच्या कुटुंबाला अमृतासमान दुध दिले. वयपरत्त्वे आता गाय वृद्ध झाली आहे. तरीपण कृतज्ञतेच्या जाणिवेतून त्या गाईचे तो संगोपन करतो. स्वतःपुरती थोडीफार शेतीही तो करतो. १० वर्षांपूर्वी श्रीधरने ‘बायोगॅस’ बांधला. सध्या २ गाईंच्या शेणावर त्याचा ‘बायोगॅस’ उत्तमरित्या सुरु आहे. ‘बायोगॅस’ असल्यामुळे दुध न देणारी पहिली गायपण मी सांभाळू शकलो, असे काल तो सांगत होता. इंधनाचा वाचलेला खर्च त्याला गाईच्या चाऱ्या-पाण्यासाठी करता येत आहे. सामान्य शेतकऱ्याला दुध न देणारे जनावर पाळणे हे कठीण होत असते, पण ‘बायोगॅस’ असेल तर तो ते जनावर आनंदाने पाळतो. कोणत्याही वस्तूची अर्थशास्त्राच्या परिभाषेतील शाश्वतता ही अधिक महत्त्वाची असते. लहानपणापासून वाढविलेले जनावर विकायचे नाही ह्या भावनेला ‘बायोगॅस’मुळे आर्थिक आधार मिळतो. भारतातील सामान्य शेतकऱ्यांमध्ये असलेली गाईबद्दलची भावना ‘बायोगॅस’मुळे व्यवहारिकदृष्ट्या योग्य ठरली.