भुईमुग उत्पादनामध्ये सुधारित पद्धतीमुळे दुप्पटीने वाढ

    
|

   प्लास्टिक आच्छादनाचा वापर, नियंत्रित लागवड, खतांचे उत्तम नियोजन यांमुळे पारंपारिक पद्धतीमध्ये भुईमुगाच्या एका रोपाला १७ ते १८ शेंगा येतात. सुधारित पद्धतीमध्ये एका रोपाला ४० पर्यंत शेंगा आल्या. यासाठी गाव केळूस (ता. वेंगुर्ला) येथील शेतकऱ्यांचा आजरा येथे अभ्यासदौरा आयोजित केला होता. प्रत्यक्ष काम करणाऱ्या तेथील शेतकऱ्यांशी झालेली चर्चा व आपण करत असलेल्या पद्धतीमध्ये कोणते बदल केले पाहिजेत हे शेतकऱ्यांना यामुळे उमगले. यावर्षी एकूण ५ शेतकऱ्यांनी भुईमुगाची प्रात्यक्षिके केली. याचे दृश्य परिणाम फोटोमध्ये आपणास दिसत आहेत.

Bhuimug_1  H x           विज्ञान-तंत्रज्ञान व योग्य सल्ला यांमुळे उत्पादनामध्ये वाढ होते. या सर्व उपक्रमासाठी आत्मा, कृषी विभाग वेंगुर्ला व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांनी मदत केली. प्रगतशील शेतकरी श्री. आबा वराडकर व त्यांचे सहकारी यांना कृषीतज्ञ श्री. धनंजय गोळम यांचे मार्गदर्शन लाभले.