शिक्षक प्रेरणा कार्यशाळा

    
|

IBT 1         सावली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या सहयोगातून माध्यमिक विद्यालय नेरूर-माड्याचीवाडी हायस्कूलसोबत मूर्त स्वरुपात दिसणाऱ्या कौशल्य व परिसर विकास प्रकल्पाच्या अभ्यासासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या पुढाकारातून ७८ प्राथमिक शिक्षकांची कार्यशाळा नेरूर-माड्याचीवाडी हायस्कूल येथे संपन्न झाली. सेंद्रिय शेती, कंपोस्टखत, झाडांची कलम बांधणी, मधुमक्षिकापालन, ढोलपथक, फॅब्रिकेशन, इलेक्ट्रीशियन, कुक्कुटपालन यांसारखे अनेक उपक्रम या शाळेमध्ये सुरु आहेत. आपापल्या शाळेमध्येही असे काही उपक्रम सुरु करण्याचा संकल्प उपस्थित सर्व शिक्षकांनी यावेळी केला.IBT 2IBT 3IBT 4