 कोविडच्या काळामध्ये झाराप (आंबेडकरनगर) येथील युवकांनी एकत्र येत श्री. विजय परब यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गोल्डन समूह’ हा गट तयार केला. गेली २ वर्षे शेतीची कामे भात लावणी, कापणी, झोडणी सोबतच झाडांची अळी काढणे, खत घालणे अशाप्रकारची विविध श्रमकौशल्याची कामे हे सर्वजण एकत्रितपणे करत आहेत. ही कामे करणे त्यांना सोईचे व्हावे यासाठी एकूण २७,६८०/- रुपयांचे विविध प्रकारचे साहित्य ‘भगीरथ’ने त्यांना प्रदान केले.