पर्यावरणपूरक गणेश लोकचळवळ होत आहे.

    
|
Eco Friendly Ganesh 1         समाज कोणतीही गोष्ट पटकन स्वीकारत नाही. परिवर्तन हे नेहमीच हळुवार होते. कुणीतरी छोटी पायवाट तयार करावी लागते. गेल्या ३ वर्षांमध्ये सर्वांच्या सहयोगातून श्री. विलास मळगावकर सरांच्या मार्गदर्शनाखाली ५०० हून अधिक मूर्तीकारांनी ‘गोमय गणेश’चे प्रशिक्षण घेतले. देशी गाईचे शेण व स्थानिक शेतातील माती याच्या मिश्रणापासून अत्यंत सुबक व ग्राहकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या मूर्ती हे या प्रदर्शनाची विशेषता होती. Plaster of Paris (POP) ला विरोध न करता पर्याय शोधणे हे शाश्वत विकासासाठी गरजेचे होते. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यावरणपूरक गणपतीचा जिल्हा व्हावा हे आमचे स्वप्न आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने खूप लोकांपर्यंत पोहोचता आले.
Eco Friendly Ganesh 2
Eco Friendly Ganesh 3
Eco Friendly Ganesh 4