नरेगामुळे गोठ्यांचे चित्र पालटले

    
|
Gotha 1            गोठोस गावातील वृंदावन दुध उत्पादक सहकारी संस्थेने हरियाणातून मुऱ्हा जातीच्या दुधाळ म्हैशी आणल्या आहेत. चांगले गोठे बांधणे हे खर्चिक काम असते. श्री. दशरथ लक्ष्मण नाईक व सौ. सुमित्रा दशरथ नाईक यांनी बचतगटाकडून कर्ज घेऊन गोठा बांधला आहे. नरेगा योजनेतून ८० हजार रुपयांचे अनुदान त्यांना मिळणार आहे. दि. ९ जून २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. प्रजित नायर यांनी गोठोस गावामध्ये भेट दिली. एकूण ३६ गोठे बांधून पूर्ण झाले आहेत. शासन, स्वयंसेवी संस्था व सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँक, गोकुळ दुधसंघ, कोल्हापूर यांच्या सहकार्यातून उपजिवेकेची साधने संरक्षित झाल्यास गावाच्या समृद्धीचे स्वप्न वास्तवामध्ये येऊ शकते.
Gotha 2