वन्यप्राण्यांचं संकट – शेती सोडायचं की उपाय शोधायचा?

22 Apr 2025 07:00:42

वन्यप्राण्यांचं संकट – शेती सोडायचं की उपाय शोधायचा? 

 
bison
 
आज अनेक शेतकरी वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीला कंटाळून शेती सोडण्याचा विचार करत आहेत. मात्र, शेती सोडणे हे या संकटावरचे उत्तर नाही.कोकणासारख्या भागात शेती करताना या संकटाला तोंड देण्यासाठी सामूहिक शेती आणि सोलर कुंपण हा एक शाश्वत आणि परिणामकारक उपाय ठरू शकतो.
 
 
सोलर कुंपण – एक सुरक्षिततेचा कवच
भगीरथ उपक्रमांतर्गत सध्या प्रायोगिक तत्त्वावर सामूहिक शेतीत सोलर कुंपण बसवण्याचे काम सुरू आहे. साधारणतः ₹18,000 इतका खर्च येतो, परंतु त्यामुळे शेतात येणारे डुकर, गवे , माकडं यांसारखे वन्यप्राणी दूर राहतात.
हा उपाय केवळ शेतीची सुरक्षा करतो असं नाही, तर शेतकऱ्यांमध्ये सामूहिकतेची भावना निर्माण करतो आणि शेती टिकवण्याची नवी दिशा दाखवतो.
भगीरथ – एकत्र शेतीसाठी एक प्रयत्न
भगीरथ हा उपक्रम केवळ तांत्रिक मदत करत नाही, तर शेतकऱ्यांमध्ये संवाद निर्माण करून सामूहिक शेतीची चळवळ उभी करतो. पायलट प्रोजेक्टमधून हे मॉडेल यशस्वी झाले असून, भविष्यात याचा विस्तार करणे हे उद्दिष्ट आहे.
तुमच्याही शेतात सोलर कुंपण हवे आहे का? सामूहिक शेतीत सहभागी व्हायचंय? आम्हाला आजच संपर्क करा.
[8806345488]
Powered By Sangraha 9.0